रविवार, 2 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (08:30 IST)

मुंब्र्यात अग्नीवीर भरतीसाठी आलेल्या तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

The name of this dead youth is Rameshwar Deore
ठाण्यात मन हेलवणारी घटना घडली आहे. अग्निवीर भरतीसाठी आलेल्या एका तरुणाचा रेल्वेगाडीच्या धडकेत दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. रामेश्वर देवरे(22)असे या मयत तरुणाचे नाव आहे.मयत रामेश्वर धुळ्याच्या वडजाई गावातून भारतीय सैन्याचा अग्निवीर भरतीसाठी आला होता. त्याने कॉम्प्युटर मध्ये डिप्लोमा केला असून नौकरीच्या शोधात होता. 
 
मुंब्रा शहरात एमएम व्हॅली परिसरात मौलाना अब्दुल कलाम आझाद क्रीडाप्रेक्षा गृहात 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत अग्निवीर भरती प्रक्रिया सुरु आहे. या साठीवडजाई गावातील एकूण 30 तरुणांसह हा तरुण तेथे आला होता. रामेश्वर मुंब्रा स्थानकात बसला असता त्याची तब्बेत बिघडली आणि त्याला उलटी होऊ लागली. उलटी करण्यासाठी तो रुळावर गेला असता उपनगरीय रेल्वे गाडीने जोरदार धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ होत आहे.ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.