बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 11 सप्टेंबर 2024 (08:38 IST)

मुंबईमध्ये पियुष गोयल यांच्या हस्ते आकुर्ली पुलाचे उद्घाटन

piyush goyal
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईतील कांदिवली येथील आकुर्ली पुलाचे उद्घाटन केले. हा पूल सुरू झाल्यानंतर मुंबईतील रोजच्या वाहतूककोंडीतून काहीसा दिलासा मिळणार आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार पुलाच्या उद्घाटनानंतर केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की, 'आजचा दिवस संपूर्ण मुंबईकरांसाठी शुभ दिवस आहे. मी वचन दिले होते की पीएम मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात आम्ही पहिल्या 100 दिवसात हे काम जलद गतीने पूर्ण करू आणि दररोजच्या ट्रॅफिक पासून लोकांना मुक्त करू.

केंद्रातील महायुती सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्या एनडीए सरकारने मिळून हे काम वेळेत पूर्ण केले याचा मला खूप आनंद आहे.