बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 21 ऑगस्ट 2022 (17:40 IST)

Ganeshotsav 2022 : गणेश मंडळांना नियमावली जाहीर

ganesh
मागील दोन वर्ष सर्व सण कोरोनाच्या सावटाखाली गेले होते. यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे आणि सर्व निर्बंध काढल्यामुळे यंदाचे सण जल्लोषात आणि आनंदात साजरे केले जाणार आहे. येत्या 31 ऑगस्ट रोजी लाडक्या गणरायाचं आगमन होत आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेकडून गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सर्व गणेशभक्तांना या नियमांचे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे. 
 
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मंडप उभारताना 30 फुटांपर्यंत असावा. २५ फुटांपेक्षा उंच मंडप असल्यास मंडप बांधणीचा अहवाल पालिकेला सादर करणे गणेशोत्सव मंडळांना बंधनकारक असेल. मंडप परिसरातील रस्त्यांवर खड्डे आढळल्यास संबंधित मंडळाला प्रति खड्डा दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
पीओपीच्या गणेशमुर्तींवर मर्यादेचे बंधन नसले तरी मंडपाच्या उंचीवर बंधन आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात प्रतिबंध केलेल्या जाहिराती लावणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात येईल.
 
 मंडप परिसरात पालिकेने तयार केलेल्या लोकोपयोगी भित्तीपत्रके, कापडी फलक प्रदर्शीत करता येईल. मलेरिया, लेप्टो, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू साथीच्या आजारांचा धोका वाढला असून मंडप परिसर स्वच्छ ठेवण्याचजबाबदारी मंडळाची  आहे. आवाजाची पातळी अधिक होणार नाही याची काळजी संबंधित मंडळाने घेणे गरजेचे आहे. मंडपासाठी परवानगी दिली त्या ठिकाणी अन्य कुठल्याही गोष्टी करण्यास सक्त मनाई असल्याचे त्यांनी सांगितले. मंडपाच्या अंतर्गत भागात कुठल्याही प्रकारचा स्टाॅल उभारता येणार नाही.मंडप उभारताना वाहने व पादचाऱ्यांसाठी जागा उपलब्ध होईल, याची काळजी घ्यावी. मंडळाने या सर्व नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकाने केले आहे.