मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 15 मे 2021 (19:14 IST)

इमारतीचा स्लॅब कोसळला ढिगाऱ्याखाली 5 लोक अडकले तर 11 जणांना सुखरूप बाहेर काढले

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात निवासी इमारत कोसळल्यामुळे किमान 11 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
ठाणे महानगरपालिकेच्या स्थानिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांनी सांगितले की ही घटना चार मजली निवासी इमारतीत दुपारी दीडच्या सुमारास घडली.
ते म्हणाले की, चौथा मजला पडल्यानंतर इतर मजल्यांची बाल्कनीही पडत राहिली, या मध्ये  बरेच लोक अडकले.
अधिकाऱ्याने  सांगितले की स्थानिक अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि 11 जणांना सुखरुप बाहेर काढले आणि त्यांना प्राथमिक उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेले.
ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक अग्निशमन दलाचे जवान मलबा काढण्यासाठी आणि त्यात अडकलेल्या पाच लोकांना बाहेर काढण्यात मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहे.