शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (10:44 IST)

राजकीय नेत्याने पैसे बुडवल्याने व्यावसायिकाची आत्महत्या

मुंबईच्या जवळ चेंबूर येथे  एका व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे .मृतदेहा जवळ एक चिट्ठी सापडली असून त्यात त्याने त्याच्या आत्महत्येला कारणीभूत असणाऱ्याची नावे लिहिली आहे .प्रकाश राठोड पांजरापोळ रहिवासी असे या मयत व्यावसायिकाचे नाव असून त्यांचा केटरिंगचा व्यवसाय होता. राठोड हे देवनार ,चेंबूर आणि गोवंडी परिसरात विविध कार्यक्रमासाठी केटरिंगचे काम करत होते .त्या क्षेत्रातील काही बड्या नेत्यांनी त्यांना जेवणाचे काम दिले होते . मात्र नेत्यांनी लाखांचे बिल थकवले होते. नेते त्यांना त्यांचे  थकलेले  पैसे देत  नसल्याने राठोड कर्जबाजारी झाले .त्यांनी त्या नेत्यांना अनेकदा पैसे मागून देखील ते पैसे देण्यास टाळाटाळी करत होते . अखेर कंटाळून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली .पोलिसांना घटनेची माहिती मिळतातच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली . पोलिसांना घटनास्थळावरुन एक चिट्ठी सापडली आहे .त्यात त्यांनी आत्महत्येचे कारण लिहून त्या राजकीय नेत्यांची नावे लिहिली आहे .या प्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .पोलीस घटनेचा तपास करत  आहे .