शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (12:38 IST)

गणपतीसाठी एकत्र आलेल्या परिवारातील ३० जणांना करोना

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीमुळे राज्यभरात एकदम साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्यात आला. सर्वांनी बाप्पाचा उस्तव साजरा करताना सर्व नियम पाळले आहेत. पण कल्याण येथे : गणपतीसाठी एकत्र आलेल्या परिवारातील ३० जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.
 
कल्याण येथील जोशीबाग परिसरील एका चार मजली इमरतीत राहणारा एक मुलगा पहिल्यांदा करोना (coronavirus)पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर त्या मुलाच्या संपर्कात आसलेल्या ४० जणांची करोना चाचणी करण्यात आली.
 
४० पैकी ३० जणांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला आहे. गणपती दरम्यान संपूर्ण परिवार एकत्र आला होता. कल्याण डोंबवली महानगरपालिकाच्या (केडीएमसी) अधिकारी डॉ.प्रतिभा पानपाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.