मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 18 मे 2021 (09:19 IST)

आता 100 रुपयांमध्ये कोरोना चाचणी शक्य

मुंबईतील स्टार्टअप पतंजली फार्माने मुंबई आयआयटीच्या सहकार्याने सर्वसामान्यांना परवडणारे कोरोना चाचणी किट तयार केले आहे. याद्वारे अवघ्या 100 रुपयांमध्ये कोरोना चाचणी केली जाऊ शकते. विशेष म्हणजे चाचणी केल्यानंतर 10 ते 15 मिनिटांत त्याचा अहवाल मिळणार आहे. जून महिन्यात हे किट वापरात येऊ शकते, अशी अपेक्षा पतंजली फार्माकडून व्यक्‍त करण्यात आली आहे. हे किट तयार करण्यासाठी पतंजली फार्माला केंद्राच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने 75 लाखांचे अर्थसहाय्य केले आहे. तसेच आणखी 75 लाखांचे कर्जही दिले आहे.
 
यासंदर्भात माहिती देताना पतंजली फार्माचे डॉ. विनय सैनी यांनी सांगितले की, गेल्या 8-9 महिन्यांमध्ये संशोधन करून हे किट तयार केले आहे. ते कोव्हिड केंद्रांना पुरवण्यासाठी आवश्यक असलेला परवाना मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. हे किट तयार करताना मुंबईतील अनेकांचे स्वॅब घेण्यात आले.दरम्यान, या किटचा वापर ग्रामीण भागातील केंद्रांना उपयुक्‍त ठरू शकतो. ज्याठिकाणी प्रयोगशाळा नाहीत तेथे हे किट लाभदायक ठरणार आहे. सध्या पतंजली फार्मामार्फत कोरोनाच्या अँटिबॉडी टेस्टवर काम सुरू आहे. तसेच क्षयरोगाचे तत्काळ निदान करणार्‍या पद्धतीवरही काम सुरू असल्याचे डॉ. सैनी यांनी सांगितले.