मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सलग दुसऱ्या दिवशी ब्रेक

vaccination
Last Modified गुरूवार, 22 जुलै 2021 (09:13 IST)
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी ब्रेक लागला आहे. पुरेशा लस साठ्याअभावी आज गुरुवारीही मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद राहणार असल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पुरेशा प्रमाणात लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणात सातत्याने अडथळे येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेला बुधवारी रात्री उशिरा पर्यंत लससाठा प्राप्त होणार आहे. त्याचं वितरण गुरुवारी
दिवसभरात सर्व शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांना करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेला, कोविशिल्डचे 50 हजार तर कोवॅक्सिनचे 11 हजार 200 असे एकूण 61 हजार 200 डोस प्राप्त होणार आहेत. हा लससाठा उपलब्ध झाल्यानंतर त्याचे उद्या दिवसभरात वितरण केलं जाईल. त्यामुळे मुंबईत लसीकरण होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
पण, शुक्रवारी मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण सुरू होणार आहे. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.



यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

वीज नसलेली पूरग्रस्त गावं सौर दिव्यांनी उजळणार,ऊर्जामंत्री ...

वीज नसलेली पूरग्रस्त गावं सौर दिव्यांनी उजळणार,ऊर्जामंत्री यांची घोषणा
पुरामुळे ज्या गावात सध्या वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य नाही, त्या गावातील घरांना मोफत सौर ...

राज्यात एकूण ८२,०८२ करोना ॲक्टिव्ह रुग्ण

राज्यात एकूण ८२,०८२ करोना ॲक्टिव्ह रुग्ण
राज्यात करोना रुग्ण संख्येत झपाट्याने घट होत असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६.५४ ...

नाशिक शहरात या तीन ठिकाणी महापालिका उभारणार अद्ययावत ...

नाशिक शहरात या तीन ठिकाणी महापालिका उभारणार अद्ययावत रुग्णालये
नाशिक शहराच्या विकासासाठी पंचवटी, सिडको, सातपूर आणि गंगापूर या ठिकाणी नवीन अद्ययावत ...

वन्य प्राण्यांना दत्तक घ्या; वन्य जीव संवर्धनास मदत करा, ...

वन्य प्राण्यांना दत्तक घ्या; वन्य जीव संवर्धनास मदत करा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची योजना
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली येथील वन्य प्राणी आता दत्तक घेता येतील.सिंह वाघ ...

धक्कादायक! मुलानेच केली जन्मदात्या पित्याची निर्घ्रूण हत्या

धक्कादायक! मुलानेच केली जन्मदात्या पित्याची निर्घ्रूण हत्या
नाशिकच्या धोंडे गाव गिरणारे येथे मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याची हत्या केल्याची ...