शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (17:40 IST)

आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी फोटो काढला

मुंबईत थंडी अनुभवण्यासाठी अनेकजण मरीन ड्राईव्हवर मोठ्या संख्येनं येतात. याचवेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मरीन ड्राईव्हवर संध्याकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले होते. यावेळी काही तरुणांनी ओ काका, आमचा एक फोटो काढा की असं म्हणत दत्तात्रय भरणेंना फोटो काढण्याची विनंती केली. एवढ्यावरच न थांबता त्या तरुणांनी राज्यमंत्री असलेल्या दत्तात्रय भरणेंच्या हातात मोबाईल देत फोटोसाठी पोझही दिली.
 
भरणेंनीही मग कुठलेही आढेवेढे न घेता तरुणांचे अनेक फोटो काढले. तरुणांच्या विनंतीनंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे चक्क फोटोग्राफर झाले. यावेळी भरणे यांनी तरुणांसोबत मनमोकळ्या गप्पाही मारल्या. यावेळी मुलांनीही भरणे यांच्यासोबत अनेक फोटो काढत हा प्रसंग कैद केला.