Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांना डिस्चार्ज
महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आज ब्रीच कॅंडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मंगळवारी त्यांना थकवा आणि भोवळ आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
बुधवारी सकाळी त्यांना आयसीयूमधून सामान्य वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. त्याच्या अनेक चाचण्या देखील करण्यात आल्या. डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुंडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आपली तब्येत आता चांगली असल्याचं सांगितलं. त्यांनी आभार देखील मानले आहेत. त्यांनी माझ्या प्रकृती साठी प्रार्थना करणारे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक तसेच रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करणारे सर्व पक्षाचे नेते मंडळी व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले.
ते म्हणाले की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस विश्रांती घेऊन लवकरच मी पुन्हा पूर्वीसारखा बरा होऊन जनसेवेत दाखल होईल.