शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (16:08 IST)

महाविद्यालय सुरू करताना स्थानिक प्रशासनाशी विचारविनिमय करा

येत्या 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालयं सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठानं  संलग्न महाविद्यालयांना वर्ग सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहे. महाविद्यालय सुरू करताना स्थानिक प्रशासनाशी विचारविनिमय करावा आणि योग्य निर्णय घ्यावा अशा सूचना मुंबई विद्यापीठाने एसओपीद्वारे कॉलेजांना केल्या आहेत.
 
विदार्थ्यांच्या 50 टक्के उपस्थितीसह 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालयं सुरु होणार आहेत. पण महाविद्यालयात कँटिन तसंच कॅम्पस परिसरात दुकानांना बंदी असणार आहे. महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांवरही बंदी असेल.
 
महाविद्यालायत विद्यार्थ्यांना दोन डोसचे  निर्बंध असतील. दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. महाविद्यालय सुरु करताना कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक प्रशासन, महानगर पालिका निर्णय घेऊ शकतात. प्रत्येक महाविद्यालयात स्वच्छता राखणं, सुरक्षित अंतर, विद्यार्थ्यांना मास्क या नियमांचं काटेकोर पालन करावं लागणार आहे