शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (15:56 IST)

मुंबई : भांडुप परिसरातील ड्रीम्स मॉलला आग लागली

fire
मुंबईतील भांडुप पश्चिम येथील ड्रीम्स मॉलमध्ये शुक्रवारी भीषण आग लागली. आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
 
ड्रीम्स मॉलमध्ये रात्री ८ वाजता लागलेल्या आगीचे वर्णन अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेव्हल-३ म्हणजे भीषण आग असे केले आहे. कोरोनामुळे मॉल बंद असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग विझवण्याचे काम सुरू असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
विशेष म्हणजे गेल्या वर्षी २५ मार्च रोजी याच ड्रीम्स मॉलमध्ये आग लागली होती. त्यानंतर याच मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सनराईज हॉस्पिटलच्या कोविड वॉर्डमध्ये आग लागली होती. ज्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हा मॉल बंद करण्यात आला. गेल्या वर्षी लागलेल्या आगीच्या घटनेत बीएमसीने चौकशीअंती मॉल प्रशासनावर ठपका ठेवला होता.