रविवार, 13 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 (09:37 IST)

1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील 7 आरोपींविरुद्ध सुनावणी सुरू

court
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील 7 आरोपींविरुद्ध सुनावणी सुरू, 12 बॉम्बस्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता. 12 मार्च 1993 रोजी 12 बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली होती. तसेच आता या बॉम्बस्फोटातील सात आरोपींविरोधात तिसऱ्या टप्प्यातील सुनावणी सुरू झाली आहे. बॉम्बस्फोटात एकूण 257 जणांना आपला जीव गमवावा लागला तर 700 हून अधिक जण जखमी झाले होते. न्यायालयाने आतापर्यंत एकूण 106 आरोपींना दोषी ठरवले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सात आरोपींविरुद्धच्या सुनावणीच्या तिसऱ्या टप्प्याला सोमवारी विशेष न्यायालयात सुरुवात झाली आहे. हे आरोपी फरार असून वेगवेगळ्या वेळी पकडले गेले. सुनावणीच्या दोन टप्प्यात न्यायालयाने 106 जणांना दोषी ठरवले आहे. तसेच यामध्ये याकुब मेमनचाही सहभाग आहे, ज्याला जुलै 2015 मध्ये फाशी देण्यात आली होती.
 
या प्रकरणात गुंड अबू सालेमला 2005 मध्ये पोर्तुगालमधून प्रत्यार्पण करून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. 12 मार्च 1993 रोजी मुंबईच्या विविध भागात 12 बॉम्बस्फोट झाले होते तसेच त्यामध्ये 257 लोकांचा मृत्यू झाला आणि 700 हून अधिक जण जखमी झाले होते. हा हल्ला त्यावेळच्या जगातील सर्वात घातक दहशतवादी हल्ल्यांपैकी हा एक होता.

Edited By- Dhanashri Naik