मुंबईत मुसळधार पावसाचा जोर वाढला 50 उड्डाणे रद्द, विमानसेवेला फटका
मुंबईत सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा फटका मुंबई विमानसेवेला बसला असून कमी दृश्यतेमुळे आता पर्यंत 50 उड्डाणे रद्द करण्यात आल्या आहे. रद्द झालेल्या 50 उड्डाणांपैकी 42 सेवा नो फ्रिल्स इंडिगोच्या आणि 6 एअर इंडियाच्या होत्या
आज सोमवार सकाळी 11 वाजे पर्यंत मुंबई विमानतळावर मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे कमी दृश्यतामुळे सुमारे 50 उड्डाणे रद्द करण्यात आल्या आहे. इंडिगोने 42 उड्डाणे रद्द केल्या असून त्यामध्ये 20 उड्डाण प्रस्थानाच्या होत्या. सूत्रांनी ही माहिती दिली.
अलायन्स एअरने देखील आगमन -प्रस्थानच्या उड्डाणे रद्द केल्याचे सूत्रांनी सांगितले.विमानतळावर रनवेचे काम काज सकाळी 2.22 ते 3:40 पर्यत स्थगित केले.
ज्यामुळे जवळच्या विमानतळावर 27 उडणे वळवली.या उड्डाणे अहमदाबाद, इंदूर, हैद्राबाद कडे वळवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
Edited by - Priya Dixit