शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (10:45 IST)

पनिशिंग सिग्नल यंत्रणा सुरु विनाकरण हॉर्न वाजविणे महागात पडणार

नेहमीच सिग्नलजवळ मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होऊन आजूबाजुच्या रहिवाशांना त्याचा त्रास होतो. त्यापासून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी द पनिशिंग सिग्नल ही यंत्रणा सुरू केली आहे. ’द पनिशिंग सिग्नल’ ही विनाकारण हॉर्न वाजवणार्‍यांना शिक्षा करण्यासाठी असणार आहे.

समोर लाल दिवा लागल्यावर चालकांनी हॉर्न वाजविण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा आवाज जर ८५ डेसीबल पेक्षा वर गेला तर सिग्नलचा कालावधी आणखी वाढणार आहे. हा आवाज जितका वाढत जाईल तितका हा कालावधी वाढत जाईल. जोपर्यंत ध्वनिमापक यंत्राचा आवाज ८५ डेसीबलपेक्षा खाली येत नाही तोवर हिरवा दिवाच पेटणार नाही. त्यामुळे कारण नसताना हॉर्न वाजवणार्‍यांना वाहतूक कोंडीतच अडकून राहावं लागणार आहे. नाहीतर पोलिसांना सहकार्य करावे लागणार आहे.