शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 31 जानेवारी 2022 (15:23 IST)

मी वाईन पिऊन गाडी चालवली तर तुम्ही मला जवळचा बार दाखवाल की, तुरूंगात टाकाल?

महाराष्ट्र सरकारने नवीन वाईन धोरण मंजूर केले आहे. यावर मुंबई पोलिसांचे एक ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात शिवम वहिया नावाच्या युजरने ट्विटरवर मुंबई पोलिसांना गंमतीत टॅग करत म्हटले की,‘आता मी वाईन पिऊन गाडी चालवली तर तुम्ही मला जवळचा बार दाखवाल की, तुरूंगात टाकाल?
 
या व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देताना मुंबई पोलिसांनी सांगितले की, "सर, आमची इच्छा आहे की, तुम्ही एका जबाबदार नागरिकाप्रमाणे मद्यपान करून गाडी चालवू नये. तसेच ब्रेथ अॅनालायझरमध्ये दारू आढळल्यास तुम्हाला आमच्या तुरूंगाचा पाहूणचार स्विकारावा लागेल''.
 
सोशल मीडियावर मुंबई पोलिसांच्या या उत्तराची चर्चा सुरू आहे. अनेक युजर्सने त्यांचे कौतुक केले आहे. पोलिसांचे हे ट्वीट अनेकजणांनी रिट्वीट केले आहे.