गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (08:20 IST)

चाळीतील घरे जमीन खचल्यामुळे कोसळल्याची माहिती समोर आली

मुंबई अंधेरी पश्चिमेतील काही चाळीतील घरे जमीन खचल्यामुळे कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिम येथील मिठीबाई कॉलेजच्या बाजूला असलेल्या परिसरात सदर घटना घडली आहे. रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास सदर घटना घडली आहे. मिठीबाई कॉलेजजवळ मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोच्या पिलरचे काम सुरू असताना बाजूला असणाऱ्या चाळींच्या भिंती आणि घरे अचानक कोसळले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
 
तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तातडीने बचावकार्याला सुरुवात करण्यात आले. या दुर्घटनेत दोन ते तीन अडकल्याची माहिती मिळाली होती. मात्र, बचावपथकाने या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले आहे.