शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (17:09 IST)

मुंबईतील गोरेगाव येथे बिबट्याचा मुलावर हल्ला

मुंबई – मुंबईतील  गोरेगाव  येथील आरे कॉलनीमध्ये बिबट्याची दहशत वाढत असून शनिवारी 18 सप्टेंबर रोजी बिबट्याने एका आठ वर्षाच्या मुलावर हल्ला केला होता. सुदैवाने मुलाचे वडील घटनास्थळ पोहोचले व मशालीने पळवून लावले त्यामुळे सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
 
रोहित, असे त्या मुलाचे नाव आहे. रोहित शनिवारी रात्री दुकानला गेला होता. दुकानातून परतत असताना आरे कॉलनीच्या युनिट 31 मध्ये बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला. वेळीच रोहितचे वडील त्या ठिकाणी पोहोचले व बिबट्याला मशालीने पळवून लावले. यात रोहितच्या पायाला तीन ठिकाणी दुखापत झाली आहे. यामुळे परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.