रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (16:12 IST)

मुलगा घरात झोपलेला असताना पित्याने घेतला गळफास

जळगाव शहरातील समतानगरात मुकबधीर मुलगा घरात झोपलेला असताना पित्याने साडीने छताला गळफास लावून आत्महत्या केली. हेमराज रमेश शिंदे (वय ३५) असे मृताचे नाव असून या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.याप्रकरणी रामानंदनगरपोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली अाहे.
 
याबाबत असे की, हेमराज शिंदे हे ट्रॅक्टर चालक होते. पत्नी मुलीसोबत काही कामानिमित्त बाहेर गेलेली असताना हेमराजने पत्नीच्या साडीच्या सहाय्याने छताला गळफास लावून आत्महत्या केली. हेमराजने अात्महत्या केली तेव्हा त्याचा मुकबधीर मुलगा घरात झोपलेला होता. पत्नी व मुलगी घरी परतल्यानंतर सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. हेमराजने घराच्या दरवाजाची कडी आतून लावलेली होती.पत्नीने दरवाजा जोरात ढकलल्यानंतर पतीचा गळफास घेतलेल्याअवस्थेतील मृतदेह बघून आक्रोश केला.मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला.आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली अाहे.