शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (15:51 IST)

शेततळ्यात पडून मायलेकींचा दुर्देवी अंत

शेततळ्यात पाय घसरून पडून मायलेकींचा दुर्देवी अंत झाल्याची घटना काल रात्री बारामती तालुक्यातील अंजनगावी घडली आहे.या पाण्यात तिघी जणी पडल्या होत्या त्यापैकी एक मुलगी सुदैवाने वाचली आहे.
 
अश्विनी सुरेश लावंड वय वर्ष (36),समृद्धी सुरेश लावंड वय वर्ष (15),या दोघी मृत्युमुखी झालेल्याची नावे आहेत तर श्रावणी सुरेश लावंड वय वर्ष 12 ही सुखरूप असे.

घटनेच्या दिवशी अश्विनी आपल्या दोन्ही लेकींना घेऊन शेतात गेल्या. तहान लागल्यावर शेतातील शेततळ्यात पाणी घेण्यासाठी बाटली घेऊन गेली असताना समृद्धीचा पाय घसरून ती शेततळ्यात पडली. लेकीला वाचविण्यासाठी आईने प्रयत्न केला पण तिचा पाय घसरून त्या दोघी पाण्यात पडल्या. त्यांना पडलेले बघून लहानग्या श्रावणीने देखील पाण्यात उडी घेतली.त्या तिघी बुडू लागल्या.

सुदैवाने श्रावणीच्या हाती प्लास्टिकचे कागद लागले त्याला धरून ती पाण्यातून बाहेर आली.नंतर तिने आई आणि बहिणीला वाचविण्यासाठी आरडाओरड केली.तिचे ओरडणे ऐकून स्थानिक लोक तातडीने तिच्या आवाजाच्या दिशेने आले.ते येण्यापूर्वीच आई आणि लेकीचा पाण्यात बुडून अंत झाला होता.स्थानिकांच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढले या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. पोलीस तपास करत आहे.