1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (15:58 IST)

‘काका-पुतण्याच्या’ टोळीनं ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ बळकावलेली 113 एकर जमीन मोकळी केली’ – पडळकर

'Uncle-Putanya' gang liberates 113 acres of land seized by 'Mulshi Pattern' - Padalkar Maharashtra News Regional Marathi News In Marathi Webdunia Marathi
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आणखी एकदा राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडले आहे. जेजुरी मंदिर देवस्थानच्या जमिनीबाबत सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचे आभार मानत त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार कुटुंबीयांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ बळकावलेली 113 एकर जमीन मोकळी केली असल्याची टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
 
गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की,आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत,कारण श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तांना पंरपरागत मिळालेल्या देवस्थानच्या जमीनी ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ कब्जा मारलेली 113 एकर जमीन मोकळी केली.आता लवकरच यांचे पितळ जगापुढे उघडे पडणार आहे.असं पडळकर यांनी ट्वीटच्या माध्यमातुन माहिती दिली आहे.
 
पडळकर यांनी कुणाचेही नाव घेतले नाही, मात्र त्यांच्या वारंवार करत असणा-या टीकेच्या रोख हा पवार कुटुंबीयांकडे आहे.त्यामुळे,यावेळी देखील त्यांनी पवार कुटुंबीयांना लक्ष्य केल्याचे दिसून आले आहे.दरम्यान, गेल्या काही महिन्यापुर्वी जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळा अनावरणावरुनही त्यांनी मोठा वाद घातला होता.त्यानंतर,आता जेजुरी मंदिर देवस्थानच्या जमीनीसंदर्भात सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाचे आभार मानत त्यांनी पुन्हा एकदा पवार (Sharad Pawar) कुटुंबीयांवर जोरदार हल्लाबोल केल्याचे दिसते.