रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 6 जून 2020 (06:51 IST)

मुंबईतलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

टाळेबंदीमधून बाहेर येण्याची प्रक्रीया सुरू झाल्यामुळे मुंबई शहरातले व्यवहार हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. सम- विषम तारखांनुसार दुकानं सुरू असून,अत्यावश्यक सेवेसाठी टॅक्सी रिक्षाला परवानगी देण्यात आली आहे.
 
आतापर्यंत रिकामे असलेल्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसू लागली असून गेले अडीच महिने घरात बंदिस्त असलेली लहान मुलं आपल्याला लवकरच उद्यानांमध्ये खेळायला मिळणार, म्हणून आनंदात आहेत. मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स मात्र अजून काही काळ  बंदच राहणार आहेत.