शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जून 2020 (07:56 IST)

कुर्ल्यात मानखुर्द- घाटकोपर लिंक रोडवरील गोदामाला भीषण आग!

कुर्ल्यात मानखुर्द- घाटकोपर लिंक रोडवरील एका गोदामाला पहाटे मोठी आग लागली. अग्निशामनलदलाच्या ६ गाड्या आणि ३ वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे.
 
या गोडाऊनमध्ये कच्चा माल, तेलाचे जूने ड्रम होते. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणावर भडकली. साधारण १५ हजार स्क्वेअर फीट परिसरात आग पसरली. आग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे संपूर्ण परिसरात धुराचं साम्राज्य पसरले. या परिसरात दाटीवाटीने गोदामं असल्याने आग वेगाने पसरली आणि आगीत गोदामं जळून खाक झाली. लाखोंचे नुकसान झाले आहे.