शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जून 2020 (06:51 IST)

श्री जगन्नाथजी आणि कर्माबाईंची खिचडी, वाचा ही लोकप्रिय गोष्ट

प. हेमंत रिछारिया 
 
श्री जगन्नाथ मंदिर पुरी (ओडिशा) येथे सकाळी भगवान श्री जगन्नाथाला खिचडीचा नैवेद्य असतो. प्राचीन काळात त्यांची एक भाविक कर्माबाई सकाळी अंघोळ न करताच ठाकूरजींसाठी खिचडी बनवायची.  
 
पौराणिक कथेनुसार ठाकुर स्वतःच बालस्वरूपात कर्माबाईंची खिचडी खाण्यासाठी येत असे. पण एके दिवशी कर्माबाईकडे एक साधू पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी बघितले की कर्माबाई अंघोळ न करताच खिचडी बनवून ठाकूरजींना नैवेद्यात देते तर त्यांनी तिला असे करण्यास मनाई केली आणि ठाकूरजींसाठी नैवेद्य बनवायचे आणि अर्पण करण्यासाठीचे काही विशेष नियम सांगितले.
 
दुसर्‍या दिवशी कर्माबाईंनी सांगितलेल्या नियमानुसारच ठाकूरजींसाठी खिचडी बनवली ज्यामुळे त्यांना उशीर झाला त्यांना फार वाईट वाटलं की आज माझे ठाकूरजी उपाशी आहेत. ठाकूरजी जेव्हा त्याची खिचडी खाण्यास आले तेव्हा देऊळात दुपारच्या जेवण्याची वेळ झाली होती आणि ठाकूरजी उष्ट्या तोंडानेच देऊळात गेले.  
 
तिथल्या पुजाऱ्यांनी बघितले की ठाकूरजींच्या तोंडाला खिचडी लागली आहे, त्यांनी विचारल्यावर ठाकूरजीने घडलेले सर्व काही सांगितले. ही गोष्ट साधूला कळतातच त्याला पश्चात्ताप झाला आणि त्यांनी कर्माबाईंकडे त्यासाठीची दिलगिरी व्यक्त करून त्यांना पूर्वी प्रमाणे अंघोळ न करतातच ठाकूरजींसाठी खिचडी बनवून ठाकूरजींना खाऊ घालण्यास सांगितले.
 
आज देखील पुरीच्या जगन्नाथ देऊळात सकाळी नैवेद्यास खिचडीचा नैवेद्य दिला जातो. अशी आख्यायिका आहे की ही खिचडी कर्माबाईंचीच खिचडी आहे.