बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 1 ऑक्टोबर 2020 (16:08 IST)

टोल दरवाढीविरोधात मनसेचे ऐरोली टोल नाक्यावर आंदोलन

मुंबईत आजपासून टोलचे दर वाढले आहेत. टोलच्या दरात ५ ते २५ रूपयांची वाढ झाली आहे. याविरोधात मनसेने आंदोलन केले. काही वाहनांना पैसे देऊ नये, असे सांगत गाड्या टोलनाक्यावरुन मार्गस्थ केल्या. 
 
यावेळी नवी मुंबईतल्या ऐरोली टोल नाक्यावर आंदोलन करून टोल रद्द करण्याची मागणी मनसेनं केली आहे. टोल मासिक पासाचे दरही वाढतील. त्यामुळे महागाईत अधिकच भर पडेल. एकीकडे रोज वाहतूक कोंडीत अडकणाऱ्यांना सर्वसामान्य मुंबईकरांना आता मुंबईत प्रवेश करण्यासाठी वाढीव दराने टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले, असे मनसेकडून सांगण्यात आले.
 
टोल दरवाढ सरकारने मागे घ्यावी म्हणून ऐरोली टोल नाक्यावर मनसेने आंदोलन करत वाहने मोफत सोडली. मात्र काही वेळानंतर पोलिसांनी त्यांना बाजूला करत टोल नाका पुन्हा सुरु केला. यावेळी आज सौम्य आंदोलन करत असून भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी दिला आहे.