मनसेचा गुढी पाडवा मेळावा शिवाजी पार्क येथे आज
यंदा कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व निर्बंध काढण्यात आले आहे. यंदा सर्व सण आनंदाने आणि उत्साहाने साजरे करण्यासाठी राज्य सरकारने अनुमती दिल्याने दोन वर्षानंतर मुक्तपणे यंदाचा गुढी पाडवा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचा गुढी पाडवा मेळावा(MNS Gudi Padwa Melava ) मुंबईच्या शिवाजी पार्क येथे आज 2 एप्रिल रोजी पार पडत आहे. या मेळावा मध्ये माणसे प्रमुख राज ठाकरे आपल्या भाषणात काय नवीन बोलणार याचा कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या पूर्वी या भव्य मेळाव्याचे शिवसेना भवन समोर लागलेले बॅनर सर्वांचे लक्ष वेधत आहे. त्याचे कारण बॅनर वर लिहिला गेलेला संदेश''हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब यांच्या नंतर कट्टर हिंदू रक्षक राज ठाकरे' या मुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेत काय होणार, ते मनसे कार्यकर्त्यांना काय संदेश आणि सूचना देणार ही मोठी उत्सुकता आहे.