शनिवार, 6 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जानेवारी 2022 (20:50 IST)

मुंबई महानगरपालिका शाळा आणि कॉलेजेसबाहेर लसीकरण कॅम्प सुरु करणार

Mumbai Municipal Corporation will start vaccination camps outside schools and colleges
“मुंबईत सर्वाधिक लसीकरण झाल आहे. आता 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी मुंबई महानगरपालिका शाळा आणि कॉलेजेसबाहेर लसीकरण कॅम्प सुरु करणार आहे. यातून सर्वाधिक मुलांना लस कशी देता येईल याचा प्रयत्न करणार आहे.” अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री अस्लम शेख माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
 
“मुलांना शाळेत जाण्याच्या आधीच लस दिली जाणार आहे. मुंबईत जिथे जिथे कोव्हिड सेंटर होते तिथे तिथे लसीकरण सुरु केले आहे. सर्व ठिकाणी लसीकरण सुरु केले. लोकांनी लस घेतल्याने ३० टक्के लसीकरण झाले. असेही ते म्हणाले.
 
“शाळांमध्ये एका आठवड्याभरात मुलांची येण्याची संख्या वाढेल. पालिकेकडे लस तयार आहे टी तयार आहे. याशिवाय देशातील सर्वात जास्त लसीकरण केंद्र आणि आरोग्य सुविधा मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबई पालिका कुठे कमी पडले असे वाटत नाही.” अशी माहितीही मंत्री अस्लम शेख यांनी दिली.
 
”जगात सर्वाधिक रुग्णसंख्या जरी असली तरी मुंबईत 10 हजारांच्या खाली रुग्ण असल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय योग्यच आहे. किती दिवस शाळा बंद ठेवणार आहोत? हॉटेल्स, रेल्वे सर्व गोष्टी सुरु मगं शाळा बंद ठेवून किती दिवस मुलांना शिक्षणापासून दूर ठेवायचे. असही ते म्हणाले.