रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 3 जानेवारी 2022 (23:13 IST)

'बुली बाय' अॅप प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपी इंजिनीअरिंग विद्यार्थ्याला बेंगळुरू येथून अटक केली

'बुलीबाई' अॅप प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने बेंगळुरू येथील एका 21वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी ‘बुल्ली बाई’ अॅप डेव्हलपर्स वर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर या प्रकरणातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे. 'बुली बाय' अॅप प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने बेंगळुरू येथून अटक केलेला 21 वर्षीय आरोपी हा इंजिनीअरिंगचा विद्यार्थी आहे. 
अटकेनंतर, महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, "मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. आम्ही सध्या तपशील उघड करू शकत नसलो कारण त्यामुळे सध्या सुरू असलेल्या तपासात अडथळे येऊ शकतात, तरी मी सर्व पीडितांना खात्री देऊ इच्छितो. " आम्ही सतत गुन्हेगारांचा पाठलाग करत आहोत आणि ते लवकरच कायद्याला सामोरे जातील.” मुंबई पोलिसांनी 'बुली बाय' अॅप प्रकरणी बेंगळुरू येथून ताब्यात घेतलेल्या संशयिताचे वय सोडून इतर संशयिताची ओळख उघड केलेली नाही. पोलिसांनी अज्ञात गुन्हेगारांविरुद्ध आयपीसी आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिस सूत्रांनी सांगितले की, आरोपी विद्यार्थी आक्षेपार्ह ट्विटर हँडल चालवत होता आणि मजकूर अपलोड करत होता.