सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 13 एप्रिल 2023 (17:13 IST)

ढोल ताशांच्या गजरात खड्ड्यांचा वाढदिवस

मुंबईच्या कांदिवली येथे लोकांकडून चक्क खड्ड्यांचे वाढदिवस साजरे केले गेले. वारंवार तक्रार करूनही खड्डे दुरूस्त करण्यात येत नसल्यामुळे नागरिकांनी हे अनोखे पाऊल उचलले. यावेळी ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात करत हा वाढदिवस साजरा केला गेला.
 
वर्षभरापासून स्थानिक नागरिकांनी कांदिवली परिसरात पडलेल्या खड्ड्यांबाबत अनेकदा तक्रारी केल्या असून त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. यामुळे वैतागून नागरिकांनी निषेध म्हणून असे अनोखे आंदोलन केले ज्यात थेट खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला.
 
या दरम्यान "हॅप्पी बड्डे खड्डेभाई" असे बॅनर लावले गेले तसेच खड्ड्यामध्ये केक ठेवून बर्थडे सेलिब्रेशन करण्यात आले.