रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (15:46 IST)

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबईचे सीपी हेमंत नागराळे यांची भेट घेतली

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी मंगळवारी सायंकाळी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांची भेट घेतली. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

अनेक आरोपांचा सामना करणारे वानखेडे आणि नागराळे यांच्यातील बैठक सुमारे 25 मिनिटे चालली, असे अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, दोघांमध्ये नेमके काय बोलणे झाले याची माहिती मिळू शकलेली नाही.
 
ही नियमित बैठक असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये अशा बैठका सातत्याने होत असतात.
 
मुंबई पोलिसांचे एक विशेष तपास पथक क्रूझवरील अंमली पदार्थ प्रकरणात काही NCB अधिकार्‍यांकडून खंडणी उकळल्याच्या आरोपांची चौकशी करत आहे या मध्ये बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन आरोपीं पैकी एक आहे.