शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 30 मार्च 2022 (16:00 IST)

विरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी निवडणूक मोदीच जिंकतील : चंद्रकांत पाटील

राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधात विरोधकांची मोर्चेबांधणी सुरु आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी निवडणूक मोदीच जिंकतील अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावे की अन्य काही करावे हा विरोधी पक्षांचा प्रश्न आहे. परंतु भाजपाविरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच जिंकेल, असा आत्मविश्वास सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
 
यूपीएचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवावे, असा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्याविषयी प्रश्न केला असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपाविरोधी पक्षांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. त्याबद्दल आपण काही बोलणार नाही. तथापि, भारतीय जनता पार्टी बूथपातळीपर्यंत भक्कम संघटनात्मक बांधणी करत आहे. त्याच्या जोरावर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहचवू. मोदींची लोकप्रियता, त्यांच्या सरकारचे काम आणि भाजपाची संघटनात्मक शक्ती यामुळे आगामी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जिंकतील असे चंद्रकांत पाटील म्हणाले.