1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 11 मे 2022 (08:25 IST)

राज ठाकरेंच्या घरी जाऊन... उत्तर भारतीयांचा राज ठाकरेंना थेट मुंबईतून विरोध

raj thackeray
मुंबई : राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यातील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. इकडे राज ठाकरे  आणि मनसे  अयोध्या दौऱ्याची तयारी करत असताना तिकडे भाजप खासदार बृज भुषण सिंह) राज यांना रोखण्याची संपूर्ण तयारी करत आहेत. उत्तर भारतीयाचा केलेल्या अपमानाची किंमत त्यांना चुकवावी लागेल असं म्हणत राज यांना इशारा देण्यात आला आहे. यूपीनंतर आता मुंबईतही (Mumbai) उत्तर भारतीय विकास सेनेतर्फे राज ठाकरेंना विरोध होताना दिसत आहे.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 जूनला अयोध्येतील रामललाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्यासाठी मनसेनं जोरदार तयारीही सुरु केली असून, रेल्वे बुक केली जात असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र यूपीनंतर आता मुंबईतही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विरोध सुरू झाला आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष पंडित सुनील शुक्ला यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करताना, राज ठाकरेंनी प्रथम उत्तर भारतीयांची माफी मगच अयोध्येला जावं, असं म्हटलं आहे.
 
सुनील शुक्ला यांनी या संदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही पत्र लिहून आपला निषेध व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये राज ठाकरेंच्या विरोधात आंदोलन करण्याची परवानगी मागितली आहे. तसंच उद्या राज ठाकरेंच्या घरी जाऊन उत्तर भारतीयांची माफी मागण्याचं निवेदन देणार असल्याचं पंडित सुनील शुक्ला यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता मनसे आणि सुनील शुक्ला यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे.