मंगळवार, 23 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : गुरूवार, 2 जुलै 2020 (09:15 IST)

मुंबईला ऑरेंज अलर्ट, जोरदार पावसाची शक्यता

Orange alert for Mumbai
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे. मुंबईत पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. ३ आणि ४ जुलै रोजी मुंबईत मुसळधार पाऊस होईल असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे. 
 
जुलै महिन्यात भरपूर पाऊस पडेल अशीही शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली जात आहे. काही दिवसापासून पाऊस पडत नसल्यामुळे प्रचंड उकाडा झाला होता. हवामानात बदल झाल्याने ही पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. 
 
यावर्षी सरासरी एवढा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पालघरमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय उत्तर भारतातीलही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
 
केंद्र आणि राज्य सरकाराने जनतेला पावसाळ्यात जास्त काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात आजार पसरण्याची शक्तया देखील जास्त असते अशात प्रशासनासमोर कोरोनाचा संकट असताना कोरोना आणि या साथींना अटकाव करण्याचं दुहेरी संकट समोर असणार आहे.