मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मार्च 2021 (21:17 IST)

पूजाच्या वडीलांकडून चुलत आजी शांताबाई राठोड यांच्याविरोधात तक्रार दाखल

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातआता पूजाचे वडील लहूदास चव्हाण यांनी पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. लहू चव्हाण यांनी शांताबाई राठोड यांच्याविरोधात परळी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शांताबाई यांनी लहू चव्हाण यांच्यावर पाच कोटी रुपये घेऊन तोंड बंद केल्याचा आरोप केला होता. या आरोपावरुन संतापलेल्या लहू चव्हाण यांनी बदनामीची तक्रार पोलिसात केली आहे.
 
“शिवसेना आमदार संजय राठोड यांनी पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचं तोंड गप्प केलं आहे. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडणार नाहीत”, असा सनसनाटी आरोप पूजाची चुलत आजी शांता राठोड यांनी केला. पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडणार नाहीत. संजय राठोड यांच्याकडून मिळालेले पैसे त्यांनी घरातील जमिनीत पुरुन ठेवले आहेत. यांच्या घरात जावयांमध्ये वाद सुरु आहेत. सध्या पूजाचे आई-वडील नव्हे तर त्यांना दिलेला पैसा बोलत आहे. या सगळ्याच्या माध्यमातून पूजाचे मृत्यूप्रकरण दडपण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजाला न्याय मिळवून द्यावा, ही माझी नम्र विनंती असल्याचे शांता राठोड यांनी सांगितले.