मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 18 जुलै 2021 (14:37 IST)

मुंबईत पावसाचा थैमान,3 अपघातात 25 ठार झाले

मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात संपूर्ण रात्री पावसाने हजेरी लावली.3 अपघातात 25 जणांचा मृत्यू.मुंबई पावसाशी संबंधित प्रत्येक माहिती
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी दुर्घटनांमधील मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. मृताच्या नातलगातील पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर.जखमींवर मोफत उपचार केले जाईल.
महाराष्ट्र सरकारचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी चेंबूरमधील घटनास्थळाला भेट दिली.

ते म्हणाले,काल 200 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.ही घटना एक नैसर्गिक आपत्ती होती. ही भिंत आरसीसीने बनविली होती परंतु पाण्याचे सामर्थ्य थांबवू शकली नाही.
 
चेंबूरमध्ये भिंत कोसळल्याने 17 जणांचा मृत्यू.
महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक म्हणाले,बीएमसी या प्रकरणाची चौकशी करेल.ते म्हणाले की, आम्ही धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या लोकांना कायम ठिकाणी हलवू.
 
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मुंबई पावसामुळे झालेल्या अपघातातील अनेकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.
 
चेंबूरमध्ये भिंत कोसळल्यामुळे आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे, उपचारानंतर 2 जणांना सोडण्यात आले आहे.
 
रात्रभर मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील ठाणे शहरात भिंत कोसळण्याच्या किमान 4 घटना घडल्या.ठाणे महानगरपालिकेचे विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांनी सांगितले की, भिंत कोसळल्याच्या घटनेत चार ऑटो रिक्षांचे नुकसान झाले.
 
रात्री उशिरा झालेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहर आणि आसपासच्या मुंब्रा,भिवंडी आणि कल्याण या शहरांमध्ये 18 ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहे.
 
रविवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत 12 तासांच्या कालावधीत शहरात 182.36 मिमी पाऊस पडला. शहरातील आंबेडकर रोडवरील तुडुंब भरलेल्या नाल्यात एका 30 वर्षीय व्यक्तीच्या बुडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
डीसीपी प्रशांत कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रोळीत आतापर्यंत 5 मृतदेह सापडले आहेत.ढिगाऱ्यात  5-6 लोक पुरण्याची शक्यता आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातांबद्दल दुःख व्यक्त केले.पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची घोषणा.
 
रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम होत आहे. सेंट्रल मेन लाइन आणि हार्बर लाईनवर रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.
 
सायन,दादर,अधेरी, बोरिवली या सखल भागांमध्ये पूर आला.रस्ते तलावासारखे दिसत आहेत.अनेक ठिकाणी मोटार बसवून लोक घरातून पाणी काढण्यात गुंतले होते.
 
मुसळधार पावसामुळे चेंबूरमध्ये भिंत कोसळून 11 जणांचा मृत्यू.एनडीआरएफ टीम मदत व बचाव कामात व्यस्त आहे.
 
मुसळधार पावसामुळे रात्री अडीचच्या सुमारास दरड कोसळल्यानंतर मुंबईच्या विक्रोळी उपनगरात 5 झोपड्या कोसळल्या.या वेदनादायक अपघातात 3 जणांचा मृत्यू आणि 2 जण जखमी झाले.जखमींना जवळच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
 
मांडुप मध्ये भिंत कोसळून 1 ठार.
 
हवामान खात्याने आजही मुंबईत पावसाचा इशारा दिला आहे.जर आजही असाच पाऊस सुरू झाला तर परिस्थिती आणखीनच बिघडू शकते.