1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 26 एप्रिल 2022 (15:36 IST)

राणा दाम्पत्याच खोटारडे,आयुक्तांनी ट्विट केला व्हिडीओ

Rana couple lied
खासदार नवनीत राणा आणि त्यांची आमदार पती रवी राणा यांचा खोटारडेपणा उघड करणारा एक व्हिडीओ मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विट केलाय. हा व्हिडीओ आहे राणा दाम्पत्याचा. त्यात ते बिसलरीचं पाणी पितायत एवढंच नाही तर पोलीसांनी दिलेली कॉफीही पिताना दिसतायत. रवी राणा हे कॉफीचा एक एक घोट घेतायत तर नवनीत राणा ह्या कॉफी हिसळून त्या घेताना व्हिडीओत दिसतायत.  मुंबई पोलीसांनी राणा दाम्पत्याला नेमकी कशी वागणूक दिली याचा पुरावाच मुंबई पोलीस आयुक्तांनी ट्विट केलाय.
 
12 सेंकदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत रवी राणा आणि नवनीत राणा निवांत बसलेले दिसत आहेत. रवी राणा हे निश्चिंत असल्यासारखं बसले आहेत. त्यांच्यासोबत एर लेडी आहे. तसेच एक अधिकारी बसलेला आहे. तसेच या रुममध्ये एक पोलीस बसलेला आहे. रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या समोरच्या टेबलवर बिसलेरी पाण्याच्या बाटल्या आहेत. तसेच रवी राणा हे कॉफी पित असून नवनीत राणा हा आधी कॉफी हिसळताना दिसत आहेत. नंतर त्या ही कॉफी पिताना दिसत आहेत. एखाद्या पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी दोघेही आले असावेत अशा पद्धतीने या दोघांचा या व्हिडीओत वावर दिसत आहे.