सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (15:12 IST)

साकीनाका घटना निंदनीय; फास्ट ट्रॅकवर खटला चालविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल.यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशीदेखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशीदेखील ते बोलले आहेत.झालेली घटना निंदनीय आहे.हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल.यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.