शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 16 जानेवारी 2021 (07:52 IST)

मुंबईतील शाळा अनिश्चित काळासाठी बंद राहणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. मात्र अन्य देशांमध्ये आलेले कोरोनाची दुसरी लाट अन्य राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता शाळा सुरू करण्यासंदर्भात १६ जानेवारीपासून महापालिका आयुक्तांचे पुढील आदेश मिळेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील शाळा अनिश्चित काळासाठी बंद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई, आयबी या शिक्षण मंडळाना मुंबईमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळेनुसार घेण्यास नुकतेच मुंबई महापालिकेने परवानगी दिली होती. त्याचवेळी नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग १८ जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.  मात्र अन्य देशांमध्ये कोरोना विषाणूची पसरलेली दुसरी लाट व अन्य राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा व सर्व विद्यालये १६ जानेवारीपासून मुंबई महापालिका आयुक्तांचे पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  
 
शाळा बंद ठेवण्याच्या सूचनेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी शिक्षण निरीक्षक, उपशिक्षणाधिकारी, सर्व प्रशासकीय अधिकारी (शाळा), पालिका क्षेत्रातील महापालिका प्राथमिक व माध्यमिक, खासगी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत.