मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By

मुंबईत 9 मार्चपर्यंत कलम 144 लागू

दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर मुंबईत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी 9 मार्चपर्यंत कलम 144 लागू केली आहे. या दरम्यान 4 ते 5 पेक्षा अधिक लोक एकत्र येऊ शकत नाही.
 
9 मार्चपर्यंत येथे रॅली, आंदोलन, आतिषबाजी यावर बंदी घालण्यात आली आहे. आज मुंबई पोलिसांनी या संदर्भात घोषणा केली.
 
दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.