मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जून 2022 (14:49 IST)

एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराची सुरक्षा वाढवली

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. राज्य राखीव पोलीस दलाची टीम शिंदे यांच्या घराबाहेर दाखल झाली आहे. दरम्यान, नाराज एकनाथ शिंदे सध्या सुरतमध्ये आहेत. त्यामुळेच ठाण्यातल्या त्यांच्या लुईस वाडी परिसरातल्या बंगल्याजवळ पूर्णपणे शुकशुकाट आहे. तरीही खबरदारी म्हणून स्थानिक पोलिसांनी घराबाहेर पहारा वाढवला आहे.
 
ठाण्यातील अनेक जुने शिवसैनिक व शिवसेना समर्थक एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी दिसून येत आहेत. अनेक शिवसेना पदाधिकारी यांची सोशल मीडिया वर पोस्ट करुन एकनाथ शिंदेना समर्थन दिले आहे. साहेब बोलतील तो आदेश अशा आशयाचे पोस्ट व्हायरल होत आहे.