सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 22 जानेवारी 2020 (13:57 IST)

...तर दोन वर्षात बाबासाहेबांचे स्मारक पूर्ण होईल : शरद पवार

25 टक्के काम झाले असून अजून 75 टक्के करायचे आहे. जर कंपनीने मनापासून ठरवले आणि कोणत्या परवानग्या शिल्लक राहिल्या नाहीत तर 2 वर्षात काम पूर्ण होईल. इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेची पाहणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार बोलत होते.

शापूजी पालनजी कंपनीने हे आव्हान म्हणून स्वीकारायला हवे. हे स्मारक मुंबई महाराष्ट्राच्या पर्यटनाच्यादृष्टीने आकर्षण असेल.