वकिलांना आता प्रायोगिक तत्वावर रेल्वेने प्रवास करण्याची सशर्त मुभा

bombay high court
Last Modified बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (10:11 IST)
न्यायालयातील सुनावणीसाठी
हजेरी लावणा-या वकिलांना आता प्रायोगिक तत्वावर रेल्वेनं प्रवास करण्याची सशर्त मुभा देण्यास तयार असल्याचं राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं. त्यामुळे आता ज्या वकिलांना प्रत्यक्ष सुनावणीला हजेरी लावायची असेल त्यांना हायकोर्टाच्या रजिस्ट्रार कार्यालयातून तसं प्रमाणपत्र घेऊन रेल्वेनं प्रवास करता येणार आहे. त्यामुळे सध्या प्रायोगिक तत्वावर 18 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा हायकोर्टातील वकिलांसाठी सुरू राहणार आहे. त्यानंतर अन्य कनिष्ठ न्यायालयांसाठी याचा विचार करु, असं हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे.
मुंबई उच्च न्यायालयासह इतर न्यायालयांचं प्रत्यक्ष कामकाज हळूहळू सुरू झालं आहे. त्यामुळे वकिलांना न्यायालयात हजेरी लावाणं क्रमप्राप्त आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वेतून वकिलांना प्रवास करायला परवानगी द्यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका अॅड. उदय वारुंजीकर आणि अॅड. शाम देवानी यांच्यामार्फत हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली. यात ज्या वकिलांना प्रत्यक्ष सुनावणीला हजेरी लावायची असेल त्यांनी रजिस्ट्रार कार्यालयात अर्ज द्यावा, त्यावर रजिस्ट्रारकडून ईमेलवर प्रमाणपत्र पाठविले जाईल. या पत्रावर संबंधित वकिलांना त्या दिवसाचं तिकीट काढता येईल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. ज्यांना पत्र मिळालं असेल त्यांनाच रेल्वेनं त्या विशिष्ट दिवसाचे तिकिट द्यावं, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच याचा गैरवापर वकिलांनी करु नये आणि तसं केल्यास बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवामार्फत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

काय या दक्षिण भारतीय अभिनेत्रीशी लग्न करणार आहे जसप्रीत ...

काय या दक्षिण भारतीय अभिनेत्रीशी लग्न करणार आहे जसप्रीत बुमराह?
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या आठवड्यात लग्न करू शकतो. ...

मुंबईत कराची बेकरीची शॉप बंद, मनसेने दिला होता इशारा

मुंबईत कराची बेकरीची शॉप बंद, मनसेने दिला होता इशारा
मुंबईतील वांद्रा येथील कराची बेकरी बंद केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाकिस्तानी ...

AIBA चॅम्पियन्स अँड व्हेटेरन्स समितीच्या अध्यक्ष म्हणून ...

AIBA चॅम्पियन्स अँड व्हेटेरन्स समितीच्या अध्यक्ष म्हणून एमसी मेरीकॉम यांची नियुक्ती करण्यात आली
सहा वेळा विश्वविजेते एम.सी. मेरीकॉम यांची आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन (AIBA) ...

जळगावमधील महिला शोषण प्रकरणात गृहमंत्र्यांची पोलिसांना ...

जळगावमधील महिला शोषण प्रकरणात गृहमंत्र्यांची पोलिसांना क्लीन चीट
जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात ...

कोरोनाचा कहर अजून बाकी आहे! जर्मनीमध्ये लॉकडाउन 28 ...

कोरोनाचा कहर अजून बाकी आहे! जर्मनीमध्ये लॉकडाउन 28 मार्चपर्यंत वाढविण्यात आला
मागील आठवड्यात देशात प्राथमिक स्तरापर्यंतच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आल्या. ...