मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 29 जून 2024 (09:39 IST)

महाराष्‍ट्र सरकारने मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्स केला कमी

petrol diesel
महाराष्‍ट्र सरकारने शुक्रवारी विधासभेच्या मान्सून सत्रामध्ये अंतिम बजेट 2024 सादर केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्‍ट्र सरकारने या बजेटमध्ये राज्यातील लोकांसाठी अनेक कल्‍याणकारी घोषणा केल्या आहे. 
 
महाराष्‍ट्र सरकारने या बजेटमध्ये मुंबईकरांना देखील सहभागी केले आहे. महाराष्‍ट्र सरकारचे उपमुख्‍यमंत्री यांनी घोषणा केली की, मुंबई महानगरीय क्षेत्रामध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्स कमी करण्यात येत आहे.
 
महाराष्ट्र सरकारने घोषणा केली की, मुंबई क्षेत्रासाठी डिझेलवर टॅक्स 24 प्रतिशत कमी करून 21 प्रतिशत केला जात आहे. वॅट टॅक्स कमी केल्या केल्याने डिझेलच्या किमती 2 रुपये प्रति लीटर कमी होईल.
 
तसेच पेट्रोलची गोष्ट केली तर मुंबई मुंबई क्षेत्रामध्ये पेट्रोल वर टॅक्स 26 प्रतिशत आहे ज्याला कमी करून 25 प्रतिशत केला आहे.यानंतर पेट्रोलच्या किंमतींमध्ये 65 पैसे प्रति लीटर मध्ये कमी येईल.