रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 25 एप्रिल 2022 (11:11 IST)

पत्रिकेवरील चुकीमुळे लग्न मोडले

बऱ्याच वेळा आपण वधूपक्षाने कमी हुंडा दिला, किंवा मानपानात काही कमी केल्याने वरपक्ष लग्न मोडतानाच्या बातम्या ऐकल्या आहेत. पण पालघरात एका वराने लग्नाच्या पत्रिकेत त्याच्या पदवीचा विस्तृत उल्लेख न केल्याने चक्क लग्नच मोडल्याची माहिती मिळत आहे. 
 
पालघरातील रहिवासी डॉ.असलेल्या मुलाचे लग्न एका सिव्हिल इंजिनिअर मुलीशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने ठरले. दोघांची भेट झाली आणि नंतर त्याचे प्रेमात रूपांतरण झाले. त्यांनी कुटुंबियांच्या सम्मतीने लग्न करण्याचे योजिले. लग्नाची तारीख 25 एप्रिल निश्चित झाली. परंपरेनुसार, वधूचे आई-वडील  हे वर पक्षाला पहिली निमंत्रण पत्रिका देण्यास गेले. त्यात वधूची पदवी छापण्यात आली, मात्र नवरदेवाच्या डॉ. पदवीचा काहीच उल्लेख केला नाही. या कारणास्तव नवरदेवाने चिडून लग्नास नकार दिला आणि लग्न मोडले. 
 
लग्नाला नकार दिल्यामुळे होणाऱ्या वधूने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या नवरदेवाच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नातेवाईकांमध्ये संताप होत आहे. हा नवरदेव फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.