गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 20 मार्च 2021 (09:45 IST)

एनआयएने सचिन वाझेंना घटनास्थळी नेत गुन्ह्याचे नाट्यरूपांतरण केले

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ उभी केल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली होती. दरम्यान, सध्या एनआयएकडून सचिन वाझेंची कसून चौकशी सुरू आहे. तसेच वाझेंविरोधात सबळ आणि भक्कम पुरावे उभे करण्यासाठी एनआयएचे अधिकारी युद्धपातळीवर तपास करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, एनआयएने सचिन वाझेंना घटनास्थळी नेत गुन्ह्याचे नाट्यरूपांतरण करवून घेतले. 
 
दरम्यान, सचिन वाझे यांच्याविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एटीएसने कोर्टात केला आहे. एटीएसच्या या दाव्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणातही हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे