शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (10:47 IST)

काळ आला होता पण वेळ आलेली नव्हती; ट्रेन मध्ये चढताना महिलेचा पाय घसरला आणि; व्हिडीओ व्हायरल

असे म्हणतात की अति घाई संकटात नेई , अति घाई केल्याने व्यक्ती संकट सापडतो. या मध्ये त्याला आपले जीव देखील गमवावे लागतात. असे काहीसे घडले आहे मुंबईच्या सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर. येथे एक महिला घाईघाईने चालत्या ट्रेनमध्ये चढताना तिचा पाय घसरला आणि ती रेल्वेखाली जाणार तेवढ्यात तिथेच असलेली एक महिला कॉन्स्टेबल ने चपळाई ने जाऊन तिला रेल्वेच्या खाली जाण्यापासून रोखले आणि तिचे प्राण वाचवले.ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही  कैमरात कैद झाली असून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे.
 
 मुंबईच्या सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर गुरुवारी 21 ऑक्टोबर रोजी एक 50 वर्षीय महिला चालत्या ट्रेन वर चढ़णाच्या प्रयत्न करत असताना तिचा पाय घसरला आणि ती महिला रेल्वे खाली जाणार तेवढ्यात तिथे RPF च्या महिला कॉस्टेबल सपना गोलकर यांनी चपळाईने धावत जाऊन महिलेला खेचून आपल्या कडे ओढले आणि त्या महिलेला रेल्वे खाली जाण्यापासून रोखले. जर सपना तेथे नसत्या तर मोठे अनर्थ घडले असते.सपना गोलकर यांचं रेल्वे संरक्षण दलाने त्यांच्या धाडस कृती साठी कौतुक केले आहे. RPF ने ट्विट करून सपनाचे कौतुक केले आहे.