सिगारेट न दिल्याने तरुणाने मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला केला
ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठाण्यात सिगारेटच्या कारणावरून मित्रावर अमानुष हल्ला केल्याप्रकरणी 18वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे . एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली.
सिगारेट न दिल्याने तरुणावर धारदार चाकूने हल्ला पोलिसांनी सांगितले की, दोघेही इतर मित्रांसोबत भिवंडीतील एका हॉटेलमध्ये जेवत होते. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार,मित्राने सिगरेट मागण्यावरून दोघात वाद झाला आणि भांडण विकोपाला गेले आणि हाणामारी सुरू झाली.
हा वाद वाढला आणि आरोपीने पीड़ितवर धारदार चाकूने हल्ला केला त्याला गंभीर जख्मी केले. या घटनेची माहिती पीड़ितच्या मित्राने पोलिसांना दिली.या वरुन आरोपीला अटक करण्यात आली.
पीडितवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Edited By - Priya Dixit