बीडीडी चाळकऱ्यांसाठी कॅबिनेटचा ‘मोठा निर्णय’, सरकारच्या २२० कोटींवर पाणी  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  मुंबईतील वरळीच्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचं भूमीपूजन काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलं होतं. अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प अखेर मार्गी लागल्याचं चित्र आहे.
				  													
						
																							
									  
	 
	यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीडीडी चाळ धारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आज पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत मूळ सदनिकाधारकांसाठी अवघी १ हजार रुपये स्टॅम्पड्युटी आकारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यामुळे सरकारला २२० कोटींवर पाणी सोडावं लागणार आहे.
				  				  
	 
	बीडीडी चाळकरांचं पुनर्वसन होणार असून यात प्रत्येक घरमालकाला कोणतंही शुल्क न आकारता ५०० स्वेअरफुटांचा फ्लॅट दिला जाणार आहे. मूळ सदनिकाधारकांसाठी अवघी १ हजार रुपये स्टॅम्पड्युटी आकारण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसंच ही स्टॅम्पड्युटी मूळ सदनिका मालक नव्हे, तर म्हाडाकडून भरली जाणार आहे. त्यामुळे बीडीडी चाळकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंळाची बैठक पार पडली. यामध्ये बीबीडी चाळकरांना हे गिफ्ट मिळालं आहे.