गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (08:52 IST)

मुंबईमध्ये अधिकृत मुद्रांक विक्रेता बनण्याची संधी’ या आशयाचा समाज माध्यमांवरील व्हायरल संदेश खोटा;विश्वास न ठेवण्याचे प्रधान मुद्रांक कार्यालयाचे आवाहन

मुंबईमध्ये अधिकृत मुद्रांक विक्रेता बनण्याची संधी,शासकीय परवाना शासकीय नोकरीप्रमाणे चांगली संधी’  या मथळ्याखाली समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेला संदेश हा चुकीचा आणि खोटा असून त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रधान मुद्रांक कार्यालयाने केले आहे.
 
मुंबई शहर व उपनगरांमध्ये १५० ते २०० अधिकृत मुद्रांक विक्रेता परवाना देण्याच्या संदर्भाने खोटा संदेश व्हायरल होत आहे. प्रधान मुद्रांक कार्यालयामध्ये फक्त १२ अधिकृत मुद्रांक विक्रेते उपलब्ध असल्यामुळे शासनस्तरावर नवीन मुद्रांक विक्रीचे परवाने देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.याबाबतचा अर्ज अपर मुद्रांक नियंत्रक यांचेकडे करावा व शासकीय कार्यालयात संपर्क साधावा अशा आशयाचा संदेश आणि अर्जाचा नमुना समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे.सदरचा व्हॉटसऍप संदेश या कार्यालयामार्फत प्रसारित करण्यात आलेला नाही.सदरचा संदेश हा अनधिकृत, खोटा असल्याचे प्रधान मुद्रांक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.