बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (15:31 IST)

दिव्यात आगीमुळे घर कोसळून महिलेचा मृत्यू

दिवा येथील देसाई गावात वेताळ पाड्यात मोठे अग्निकांड झाले. या अग्निकांडात घर कोसळून घराची मालकीण सपना विनोद पाटील(40) यांचा दुर्देवी अंत झाला. ही घटना आज सकाळी 11:30 च्या सुमारास घडली.विनोद पाटील यांच्या मालकीचे हे घर पडीक झाले होते या घराला आग लागली आणि घर कोसळले. त्यात दोघे जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. घटनेची माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे पथक कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले. तातडीनं आग विझवण्याचे काम केले. घराच्या ढिगाऱ्यात दबून सपना विनोद पाटील यांचा मृत्यू झाला. ही माहिती ठाणे महापालिका व्यवस्थापन विभागाने दिली.